मुळव्याधवरील आयुर्वेदिक उपचार (Ayurvedic Treatment for Piles)

ayurvedic treatment of piles

मुळव्याधीचा त्रास हा अत्यंत भयंकर आहे. हा त्रास वेदनादायी असला तरीही या आजाराबद्दल फारसे खुलेपणाने बोलले जात नाही. परिणामी अनेकांमध्ये या आजाराची तीव्रता वाढल्यानंतर वैद्यकीय मदत घेतली जाते. आयुर्वेदामध्ये याला “अर्श” म्हणतात. मुळव्याध हा रूग्णाला बेजार करून टाकणारा आजार आहे. सुरूवातीला याची लक्षणे जाणवत नाहीत. अवघड जागेवर असल्यामुळे  याचे  निदान आणि उपचार करण्यासाठी अनेकांना संकोच वाटतो. या कारणामुळे बऱ्याचदा मुळव्याधीकडे दुर्लक्ष केले जाते.

      जेव्हा दैनंदिन काम करणे किवां बसणे कठीण होते तेव्हा यावर उपचार करण्याकडे भर दिला जातो. तोपर्यंत मुळव्याधीची समस्या अधिकच वाढलेली असते. यासाठी प्रत्येकाला मुळव्याधीविषयी माहीत असणं  गरजेचं आहे. कारण वेळेवर उपचार केल्यास मुळव्याधीपासून नक्कीच मुक्तता मिळू शकते. मुळव्याधीवर वैद्यकीय आणि घरगूती अशा दोन्ही प्रकारे उपचार केले जातात.

    मुळव्याध हा गुदद्वाराच्या मुखावर होणारा एक विकार आहे. आयुर्वेदानुसार या विकाराची दोन प्रकारात विभागणी करता येऊ शकते.  एका प्रकारात गुदद्वारावर मोडासारखा भाग येत असल्यामुळे त्याला मोड मुळव्याध असे म्हणतात. तर दुसऱ्या प्रकारात गुदद्वारातून रक्त येत असल्यामुळे त्याला रक्त मुळव्याध असे म्हणतात. मोड मुळव्याधीचे रूपांतर रक्त मुळव्याधीत होऊ शकते. मुळव्याधीमुळे अति्रक्तस्त्राव झाल्यास अशक्तपणा येऊ शकतो. बऱ्याचदा यामुळे संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो. मुळव्याधीचा त्रास लहान मुलांना होत असेल तर त्याला रेक्टल प्रोलॅप्स असं म्हणतात. शौचाला त्रास झाल्यामुळे गुदद्वारीचे मांस बाहेर येण्याला रेक्टल प्रोलॅप्स ( Rectol Prolapes) असं म्हणतात.

 

मुळव्याधाची लक्षणे (Symptoms Of Piles)

शौचास त्रास होणे, शौच करताना वेदना आणि रक्त येणे, गुदद्वाराजवळ खाज येणे, गुदद्वाराजवळील मांस बाहेर येणे, बसण्यास त्रास होणे. इत्यादी.

कारणे

बद्धकोष्ठता, सतत बसून राहणे, मद्यपान, धुमपान करणे, जागरण, अयोग्य वेळी जेवणे, अनुवांशिकता, शिळे अन्न खाणे, गरोदरपणा, जास्त वजन उचलणे,

मुळव्याधचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी घरगुती उपाय (Ayurvedic treatment of piles)

सुरूवातीच्या टप्प्यामध्ये मुळव्याधच्या समस्येकडे लक्ष दिल्यास त्याचे गंभीरस्वरूपहोण्याचा धोका कमी होतो. काही घरगुती उपायांनी त्यावर मात करता येऊ शकते. मुळव्याधच्या  उपचारांसाठी आयुर्वेदि दृष्टिकोण योग्य आहे. ज्या लोकांना मुळव्याधचा अनुभव आहे त्यांनी आयुर्वेदिक उपचार करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.

लिंबाचा रस (Lemon Juice)

लिंबाच्या रसामध्ये पोषक घटक आहे. लिंबाचा रस केशिका आणि रक्तवाहिन्या बळकट करते. त्यामुळे  ्मुळव्याधवर उपचार करण्यात याचा उपयोग केला जातो. एक कापसाचा बोळा घेऊन त्याला लिंबाच्या रसाने भिजवा व मुळव्याधवर लावा. यामुळे सुरुवातीला चिडचिड होऊ लागते परंतु लवकर वेदना पासून आराम मिळतो.

त्रिफळा पावडर( Triphala Powder)

वर नमूद केल्याप्रमाणे बद्धकोष्ठता मुळव्याध होण्याचे प्रमुख कारण आहे, बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी त्रिफळा पावडर नियमितपणे घ्यावे. गरम पाण्यात झोपायच्या आधी दररोज रात्री ग्रॅम त्रिफळा पावडर घ्यावे.

एरंड तेल(Castor Oil)

एरंड तेलामध्ये एंटी-ऑक्सिडंट, एंटी-फंगल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी ई. गुणधर्म आहेत. दररोज रात्री 3 मिलीलीटर एरंडेल तेल प्यावे . म्हणून या घटकामुळे  मुळव्याधचा आकार कमी होण्यास मदत होते. 

कोरफड (Aloe Vera)

कोरफड जेल ऐतिहासिकदृष्ट्या मुळव्याधावर उपचार करण्यासाठी वापरला जाते. यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेतमुळव्याधावर शुद्ध कोरफड जेल वापरावे.

कडुनिंब (Neem)

कडुनिंबाच्या निम्बोड्या घ्या. त्यावरील साल काढून आतील बीज काढा. हे बीज कुटून त्याच्या गोळ्या करा. या गोळ्या नियामित दूधासोबत घ्याव्यात. या उपायादरम्यान आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. मांसाहार, पचायला जड असणारे पदार्थ आहारात टाळा. यामुळे मुळव्याधाचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते.

चहा झाडाचे तेल (Tea Tree Oil)

चहाच्या झाडाच्या तेलामध्ये पूतिनाशक आणि विरोधी दाहक गुणधर्म आहे. त्यामुळे मुळव्याधामध्ये होणारी सूज आणि खाज कमी होण्यास मदत होते.

सेंधव मीठ आणि ग्लिसरीन (Rock Salt & Glycerin )

हे घरगुती उपचार वेदनादायक मुळव्याध कमी करण्यास मदत करते. 2 चमचे ग्लिसरिन् व 2 चमचे सेंधव मीठ मिसळा. मिश्रण कापसाच्या बोळावर घेवुन  वेदनादायक क्षेत्रावर ठेवा. हा प्रयोग मुळव्याधावर  15 ते 20 मिनिटे ठेवा. त्यामुळे लवकर आराम होईल.

चिया

चियाचे सेवन बद्धकोष्ठता सुधारण्यास मदत करते. हे दही, तृणधान्ये किंवा फळांसह मिसळले जाऊ शकते. एका ग्लासमध्ये 2 चमचे चिया बीज भिजत घाला् आणि २-३ तासानंतर प्यायल्याने त्रास कमी होईल.

इतर घरगुती उपचार (ayurvedic treatment of piles )

 • तीन ते चार वाळलेले अंजीरांना रात्रीच्या वेळी पाण्यात भिजवा. दिवसातून दोनदा भिजवलेले अंजीर खावे.
 • डाळिंबाची साल थोडी पाण्यात उकळवा. दिवसातून दोन वेळा हे पाणी गाळून प्यावे.
 • मुळव्याधमध्ये होणारी वेदना कमी करण्यासाठी ताक, त्यात सेंधव मीठ, आले आणि मिरपूड घालावे. दिवसातून दोनदा हे प्यायल्याने लवकर आराम होतो.
 • रक्तस्त्रावापासून मुक्त होण्यासाठी एक चमचा मोहरीचे दाणे ,अर्धा कप बकरीच्या दुधात मिसळा, त्यात थोडी साखर घाला. सकाळी  रिकाम्या पोटी प्या.
 • वाळलेल्या आंब्याच्या कोयाच पावडर करा व या पावडरमध्ये दोन चमचे मध घालून दिवसातून दोनदा खा.
 • पुदीण्याची पानामध्ये  १ चमचा मध, एक चमचा आले आणि लिंबाचा रस मिसळवा. ते दिवसातून दोन ते तीन वेळा घ्या.

घरगुती मलम( How we make Local Application at home?)

घरगुती मलम कसे तयार करावे? रुईच्या पानांचा चीक काढा. यामध्ये हळद मिसळून पेस्ट बनवा. या पेस्टचा केवळ एक ठिपका त्रास होत असलेल्या जागी लावा. नियमित सात दिवस हा उपाय केल्याने मुळव्याधाचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होईल.

पथ्य(Do’s)

 • भरपूर प्रमाणात पाणि प्यावे.
 • आहारात पुरेसे तंतु घ्यावे.
 • नियमित व्यायाम करा.
 • वजन जास्त  असल्यास वजन कमी करावे.
 • ताक, कांदा, पालेभाज्या आणि हरभरा वगैरे खावे.
 • पचनास कठीण असे कोणतेही भोजन  खाऊ नये.
 • मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाऊ नये.
 • रोजच्या आहारात भेंडी, पालक, गाजर, मुळा यांचे  सेवन वाढवा.
 • गुद्द्वार क्षेत्र स्वच्छ ठेवा.

अपथ्य (Don’ts)

 • कठोर पृष्ठभागावर जास्त बसू नका कारण ते गुदद्वारासंबंधीच्या क्षेत्राभोवती रक्त प्रवाह प्रतिबंधित करू शकते.
 • टॉयलेटमध्ये जास्त काळ बसू नका. या स्थितीमुळे गुद्द्वार क्षेत्रावर अतिरिक्त दबाव निर्माण होतो.
 • कॉफी किंवा मद्यपान करू नका.
 • भारी वस्तू उचलू नका.
 • कोणतीही औषधे थेट खाऊ नका; हे आपल्या पोटासाठी तसेच रोगांसाठी हानिकारक ठरू शकते.
 • रेचक औषध नियमितपणे वापरू नका. कारण यामुळे आतड्यांची कार्य करण्याची क्षमता कमी होऊ शकते.

 तुम्हाला आमचा लेख कसा वाटला हे नक्की कळवा.

सुविचार:- मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.