थायरॉईड व आयुर्वेद (Thyroid and Ayurveda)

thyroid treatment in ayurveda

थायरॉईड (Thyroid) निदान ही गतिहीन जीवनशैलीचे लक्षण आहे. होय थायरॉईड हा आजार नसून जीवनशैलीचा विकार आहे. या व्याधीचे दोन प्रकार आहेत. जेव्हा थायरॉईड ग्रंथीचे (Thyroid gland) संप्रेरक उत्पादन कमी होते. तेव्हा त्याला हायपोथायरायडिझम (Hypothyroidism) असे म्हणतात. परिणामी शरीराची चयापचय देखील कमी होते. हायपोथायरॉईडीझम असलेल्या व्यक्तीचे वजन वाढण्याची प्रवृत्ती असते. तर हायपरथायरॉईडीझम ( Hyperthyroidism)एक अशी स्थिती आहे. जिथे थायरॉईड ग्रंथी थायरॉईड संप्रेरकांना जास्त प्रमाणात वाढते. यामध्ये व्यक्तिचे वजन वाढत जाते. थायरॉईड शरीरात कोणत्या कारणामुळे निर्माण होते? आयुर्वेदाचा उपयोग करुन आपण कसे त्याचे निवारण् करु शकतो? (thyroid treatment in ayurveda) आयुर्वेदानुसार थायरॉईड शरीरात वात आणि कफ दोष वाढीमुळे उत्त्पन्न होणारा आजार आहे. दोष ही जैविक उर्जा आहेत जी मानवी शरीरात शारीरिक आणि मानसिक प्रक्रियेवर नियंत्रण ठेवते. वात दोषामध्ये वायुचे गुण आहेत. कफ दोषामध्ये पृथ्वी आणि जलाचे गुण आहेत. शरीरातील या दोषांच्या असंतुलनामुळे थायरॉईड निर्माण होतो.

आयुर्वेद औषध शरीरातील उर्जा संतुलित करून शरीरात थायरॉक्सिन संप्रेरकाचे संचार सुधारून थायरॉईड नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करतो. येथे थायरॉईड रूग्णांसाठी काही सोपे उपाय सांगितले आहे. ज्याचा उपयोग करुन थायरॉईडवर नियंत्रित करता येउ शकते.

Thyroid treatment in Ayurveda

नारळ तेल (Coconut oil)

नारळ तेलात मध्यम-साखळीयुक्त फॅटी ॲसिड असते. जे थायरॉईड ग्रंथीचे  कार्य योग्य करण्यास मदत करते. नारळ तेल, विशेषत: नॉन-हीट फॉर्ममध्ये घेतल्यास वजन कमी करण्यास मदत होते. यामुळे चयापचय वाढते आणि शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते. व्यायामाचे योग्य संयोजन आणि योग्य संतुलित आहारामुळे नारळ तेल थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारण्यास मदत करते.

ॲपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar )

ॲपल साइडर व्हिनेगर हार्मोन्सचे संतुलित उत्पादन आणि अभिव्यक्ती करण्यास मदत करते. हे चयापचय सुधारते. ॲपल सायडर व्हिनेगर शरीरातील चरबीचे नियमन करण्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास आणि पौष्टिक पदार्थांचे शोषण करण्यास मदत करते. ॲपल सायडर व्हिनेगर रोज सकाळी मधाबरोबर पाण्यात मिसळवुन प्यावे.

अदरक (Ginger)

थायरॉईडसाठी हा सर्वात सोपा घरगुती उपचार आहे. अदरक हे  पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारख्या आवश्यक खनिजानीं समृद्ध आहे. अदरक मुळे थायरॉईडमध्ये जी जळजळ होण्याची समस्या असते, ती कमी होते. अदरकचा चहा घेणे सर्वात सोपा उपाय आहे.

व्हिटॅमिन बी12 ( Vitamin B12)

थायरॉईडसारख्या समस्ये विरूद्ध लढण्यासाठी जीवनसत्त्वे मदत करतात.  थायरॉईडच्या योग्य कार्यासाठी ‘बी’ कुटुंबातील जीवनसत्त्वे आवश्यक असतात. विशेषत: व्हिटॅमिन बी 12 हायपोथायरॉईडीझम असलेल्या लोकांना हे अत्यंत् महत्त्वपूर्ण आहे. दररोजच्या आहारात अंडी, मांस, मासे, शेंगा, दूध आणि नट यांचा समावेश केल्यास व्हिटॅमिन बी चा निरंतर पुरवठा होऊ शकतो.

बदाम (Almond)

बहुतेक नट कोणत्याही ना कोणत्या प्रकारे शरीरासाठी फायदेशीर असतात. थायरॉईडसाठी बदाम सर्वात योग्य आहेत. हे प्रथिने (Proteins), फायबर (fibers) आणि खनिजांचा चांगला स्रोत आहेत. बदामांमध्ये सेलेनियम (Selenium) असते, जे थायरॉईडसाठी पोषक आहे. यामध्ये मॅग्नेशियम (Magnesium) देखील आहे. जे थायरॉईड ग्रंथीसाठी महत्वपुर्ण आहे.

जवसबीज (Flaxseed)

जवसबीजमध्ये फॅटी ॲसिड (fatty acid) असते. जे हृदय आणि थायरॉईडसाठी चांगले असते. ते थायरॉईड संप्रेरकांच्या निर्मितीस मदत करते. मॅग्नेशियम ( Magnesium) आणि व्हिटॅमिन बी 12 ने समृद्ध असल्यामुळे जवसबीज हायपोथायरायडिझम विरूद्ध लढा देण्यास मदत करते.

दुग्धजन्य पदार्थ

थायरॉईडसाठी दूध, चीज आणि दही खूप फायदेशीर आहेत. कारण यामध्ये आयोडीन जास्त प्रमाणात असते.  थायरॉईड ग्रंथीचे काम योग्य करण्यासाठी याची आवश्यकता असते. दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने व्हिटॅमिनची पातळी वाढण्यास मदत होते. ज्यामुळे थायरॉईडची समस्या दुर होण्यास मदत होते.

व्हिटॅमिन डी

व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे थायरॉईडची समस्या उद्भवू शकते. व्हिटॅमिन डी सुर्यकिरणांपासुन् मिळत असल्यामुळे दररोज किमान 15 मिनिट सूर्यप्रकाशमध्ये  उभे राहावे. यामुळे कॅल्शियमचे चांगले शोषण आणि रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. व्हिटॅमिन डी समृध्द चरबीयुक्त मासे, दुग्धजन्य पदार्थ,  अंड्यातील पिवळ बलक खावे.

पथ्य

  • आपल्या थायरॉईडची पातळी नियमितपणे तपासावे.
  • थायरॉईड रूग्णांनी नियमितपणे 4 ते 5 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे थायरॉईड ग्र्ंथी कार्य करते.
  • अँटिऑक्सिडंट्सयुक्त आहाराचे सेवन करावे.
  • थायरॉईड रुग्णांनी व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी समृद्ध असलेले अन्न तसेच हिरव्या पालेभाज्या सेवन करावे.

अपथ्य

  • सिगरेट आणि अल्कोहोल चे सेवन टाळावे . यामुळे थायरॉईड ग्रंथीचे कार्ये योग्य रीतीने होत् नाही. सिगारेटमुळे आयोडाइड भाग कमी होतो.
  • चरबी युक्त ,तेलकट आहार टाळावे.
  • साखर आणि कॉफी पिऊ नये.
  • स्वत:हुन औषधोपचार करु नये.

योगासने (Thyroid and Yoga )

योग आसन थायरॉईड डिसऑर्डरचा सामना करण्यासाठी एक प्रभावी नैसर्गिक उपाय आहे. हे ग्रंथी निरोगी ठेवण्यास आणि चयापचय नियंत्रित करण्यास मदत करते. सर्वांगासन, उष्ट्रासन, सेतुबंधासन,हलासन, मस्त्यासन, धनुरासन,भुजंगासन इ. योगासनचा दररोज अभ्यास करुन आपण थायरॉईड आजारा पासुन सुटका करु शकता.

तुम्हाला आमचा लेख कसा वाटला हे नक्की कळवा.

सुविचार : “जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा”.