मायग्रेनची लक्षणे व कारणे आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार ( Ayurvedic treatment of Migraine)

  मायग्रेन (Migraine) हा एक न्यूरोलॉजिकल (NEUROLOGICAL)आजार आहे. ज्यामध्ये डोकेदुखीसारखे तीव्र लक्षणे आढळतात. हे मळमळ, उलट्या, आवाज किंवा प्रकाशाबद्दल वाढलेली संवेदनशीलता यासारख्या लक्षणांशी देखील संबंधित आहे. एकुण लोकसंख्येच्या जवळपास 15% लोकांमध्ये हि लक्षणे आढळतात. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. आयुर्वेदात मायग्रेनला (Migraine and Ayurveda) अर्धावभेदक म्हटले आहे. सामान्यत: हि लक्षणे 2 ते 72 तासांपर्यंत असतात. मायग्रेनवर सामान्यत: औषधे आणि जीवनशैलीतील बदलांसह उपचार केला जातो. जर या उपचारांमुळे आपली लक्षणे दूर होत नसेल तर आपण नैसर्गिक उपचारांना प्राधान्य देवू शकता. त्यातील एक पर्याय म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदमध्ये लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी हर्बल उपचारांप्रमाणे अपारंपरिक उपचार केलेे जातात.

       आयुर्वेदानुसार मायग्रेन एक त्रिदोषज  विकार आहे. तीन दोषांपैकी वात आणि पित्त दोष हे प्रमुख दोष आहे. वात मज्जासंस्था आणि मेंदूच्या क्रिया नियंत्रित करते. त्यामुळे वाताचे असंतुलन या रोगास कारणीभूत ठरते.

लक्षणे (Symptoms of Migraine)

मळमळ व उलट्या, चिडचिड, उदासीनता, आनंदोत्सव, थकवा, अत्याधिक निद्रा, ताठर स्नायू (विशेषत: मान), बद्धकोष्ठता किंवा अतिसार.

Migraine and Ayurveda

ब्राम्ही (Bramhi)

हि वनस्पती ताण आणि नैराश्य कमी करण्यासाठी ओळखली जाते. ब्राम्ही मनावरील तणाव कमी करून विश्रांती आणि झोपेसउत्तेजना देते. ब्राम्हीमध्ये अँटिस्पास्मोडिक (Antispasmodic),अँटीकॉन्व्हुलसंट(Anticonvulsant),एंटी-इंफ्लेमेट(Anti-Inflammatory), एनाल्जेसिक (Analgesic) ई. गुणधर्म आहेत. हे सर्व गुणधर्म मायग्रेनच्या उपचारांमध्ये उपयुक्त आहे. ब्राम्ही आणि तुपाचे काही थेंब नाकात टाकल्याने डोकेदुखी शांत होते.

चंदन (Sandalwood)

चंदन डोकेदुखी शांत करणाऱ्या उपायांपैकी एक प्राचीन उपाय आहे. डोकेदुखी हि  पित्ताच्या असंतुलनतेमुळे उद्भवते. चंदन आपल्या शीत गुणधर्मामुळे पित्ताला संतुलित करून डोकेदुखी कमी करण्यास मदत करते. 1 ते 2 ग्रॅम चंदन पावडर किंवा गरजेनुसार घ्या. कपाळावर  चंदनची पेस्ट लावा. कपाळावर ही पेस्ट 20 मिनिटे लावून ठेवा.

विलायची (Cardamom)

डोकेदुखीवर छोटी विलाईची चघळणे हा एक प्रभावी उपाय आहे. डोकेदुखी सौम्य, मध्यम किंवा तीव्र असू शकते. जी संपूर्ण डोकेकपाळ किंवा डोळ्यांचा एक भाग प्रभावित करते. आयुर्वेदानुसार वात आणि पित्ताचे असंतुलन या दोन प्राथमिक कारणांमुळे डोकेदुखी उद्भवते. वेलची पावडर नियमितपणे चहामध्ये वापरल्याने  वातदोष संतुलित होते.

लवंग (Clove)

शीत गुणामुळे आणि वेदना कमी करणार्‍या गुणधर्मांमुळे लवंगचा वापर डोकेदुखी कमी करण्यासाठी केला जातो. काही लवंग तुकडे बारीक करा आणि त्यांना  स्वच्छ रुमालमध्ये ठेवा. जेव्हा जेव्हा डोकेदुखी होते तेव्हा लवंगाचा वास घ्या. एक चमचा लवंग तेल, 2 थेंब नारळ तेल, सेंधव मिठात घालून कपाळावर हळूवारपणे मालिश केल्याने आराम होतो.

दालचिनी (Cinnamon)

दालचिनी एक चमत्कारी मसाला आहे. जो डोकेदुखीवर प्रभावी उपाय म्हणून ओळखला जातो. दालचिनीची बारीक पावडर करा. पाणी घालून जाडसर पेस्ट बनवा. ते कपाळावर लावा.  30 मिनिटे लावून झोपा. नंतर कोमट पाण्याने धुवून घ्या.

पुदिना तेल (Peppermint oil)

 
पुदिना दोषांना नैसर्गिकरित्या संतुलीत करून विविध प्रकारांच्या आजारान्हा दूर ठेवते. सामान्यतः पचनासाठी याचा उपयोग केला जातो. परंतु मायग्रेनच्या उपचारासाठी देखील याचा उपयोग केला जातो. पुदिना सायनस आणि कवटीच्या सभोवतालच्या स्नायूंना आराम देते. कपाळावर पुदिना तेलाचा वापर केल्यास डोकेदुखीच्या वेदना, मळमळ, उलट्या आणि प्रकाशाची तीव्रता ई. लक्षणे कमी होतात. पुदिनामध्ये मेन्थॉल हे रासायनिक संघटन आहे. ज्यामुळे डोक्यातील  रक्तवाहिन्या उघडण्यास मदत होते.

अद्रक (Ginger)

स्वयंपाकामध्ये मोठ्या प्रमाणात अद्रकचा वापर केला जातो. मायग्रेनच्या उपचारांमध्ये याचा उपयोग होतो. डोक्यातील रक्तवाहिन्यांची जळजळ कमी होण्यास मदत होते. त्यामुळे वेदना कमी होतात. तसेच पाचन, श्वसन आणि रक्ताभिसरण कार्यांना चालना देते. अद्रक यात अँटिऑक्सिडंट (Antioxidant) आणि अँटी-इंफ्लेमेटरी (Anti inflammatory) गुणधर्मा आहे.  आल्याचा ताजा रस, पावडर, हर्बल टीमध्ये विविध प्रकारांमध्ये वापरला जाऊ शकतो. आल्याचा रस आणि लिंबाचा रस सम भाग मिसळवून दिवसातून एक किंवा दोनदा प्यावे. त्वरीत आरामासाठी कपाळावर आल्याच्या पावडरची पेस्ट लावावी.

अश्वगंधा (Ashwgandha)

 
ब्राम्हीप्रमाणे अश्वगंध ही आयुर्वेदातील  अत्यंत महत्वाची वनस्पती आहे. हि अ‍ॅडॉप्टोजेनिक (Adaptogenic) औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाते. अश्वगंधा मेंदू आणि मज्जासंस्थेची कार्ये बळकट करण्यासाठी मदत करते. हि औषधी वनस्पती तणावाची पातळी कमी करून मायग्रेनच्या(Migraine) हल्ल्यांची तीव्रता कमी करते.

तुळशी (Tulsi)

 
तुळशी ही एक सुगंधित औषधी वनस्पती डोकेदुखीच्या उपचारांसाठी वापरली जाते. तुळशी वेदनशामक आहे. तुळशी चे तेल स्नायू शिथिल करण्याचे काम करते. तसेच तणाव आणि घट्ट स्नायूमुळे उद्भवलेल्या डोकेदुखीपासून मुक्त होण्यास मदत करते. एक कप उकळत्या पाण्यात 3 किंवा 4 ताजी तुळशीची पाने घालून उकळवावे. त्यात  एक चमचा मध घालून प्यायल्याने आराम होतो.

सैंधव मीठ (Rock salt)

कधीकधी सामान्य मीठाला सैंधव मीठाने बदलणे ही तीव्र डोकेदुखीच्या उपचारांसाठी एक चांगली निवड ठरू शकते. चिमूटभर मीठ व कोमट पाणी पिल्याने डोकेदुखीवर चांगला फायदा होतो. मायग्रेनचा हल्ला डिहायड्रेशनमुळे (Dehydration) असेल तर इलेक्ट्रोलाइटच्या (Electrolyte) संतुलनासाठी मीठ, साखर पाण्यात मिसळवून प्यावे.  

आहार (Migraine and Ayurveda)

  • गरम आणि सहज पचणारे पदार्थ, शिजवलेल्या  भाज्या, सूप,  दलिया,  तपकिरी तांदूळ आणि संपूर्ण धान्य खावे .
  • सफरचंद, पपई, आंबे, द्राक्षे आणि नाशपती ही फळे खावी.
  • बदाम ,शेंगदाणे, मनुका देखील दररोज खाऊ शकतो.
  • तेलकट,  मसालेदार,  थंड आणि स्थिर पदार्थ टाळा.
  • विशेषत: रात्री दही खाणे टाळावे.
  • सतत काम करणे टाळा.

योगासने (Yoga, Migraine and Ayurveda)

योग हे एक प्राचीन तंत्र आहे.  मायग्रेनशी लढण्यासाठी योग ही साइड-इफेक्ट-फ्री (side effects free) पद्धत आहे. दररोज काही मिनिटांसाठी या सोप्या योगासनांंचा सराव केल्याने मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत होते. हस्तपादासन (Forward bending pose), सेतू बंधासन (Briged pose),शिशुआसन(ChildPose),मार्जरीआसन(Catpose)पश्चिमोत्नासन, अधोमुखासन, पद्मासन, शवासन ई. आसनांचा उपयोग तुम्ही मायग्रेन मध्ये करू शकता.

तुम्हाला आमचा लेख कसा वाटला हे नक्की कळवा.

सुविचार:- चांगल्या कामाला मुहूर्ताची गरज नसते.