Ayurvedic treatment for anemia
तुम्हाला सतत थकवा जाणवत आहे का? तुमची त्वचा फिकट गुलाबी व निस्तेज झाली आहे काय? अशक्तपणा ही एक अवस्था आहे, ज्यावेळेस आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी (RBC) कमी होत जाते. तेव्हा अशी स्थिती निर्माण होते. निरोगी लाल रक्त पेशी हे आपल्या रक्तातील मुख्य पेशी आहे. जर आपल्या शरीरात लाल रक्तपेशींची संख्या कमी झाली. तर शरीरातील पेशींना योग्यरित्या कार्य करण्यासाठी ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे थकवा जाणवतो. अस्थिमज्जामध्ये (Bone marrow) हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. शरीरात लोहाशिवाय, ते लाल रक्त पेशी रक्त( Haemoglobin) तयार करू शकणार नाही. त्याच प्रकारे जेव्हा शरीरात विटामिन क, फँलिक अॅसिड, विटामिन ब- complex ची कमी होते, तेव्हा शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. भारतामध्ये जवळपास ७०-८० % स्त्रिया या आजाराने ग्रस्त आहे. गर्भवती महिलांमध्ये, लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येऊ शकतो. हेमोग्लोबिन वाढविण्यासाठी बरेच आयुर्वेदीक व घरगुती उपचार आहेत (Ayurvedic treatment for anemia). जे एखाद्या स्थितीला चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यासाठी आपण त्याचा व्यवहारात उपयोग करू शकतो.
लक्षणे
सामान्य थकवा, अतिनिद्रा, क्षुल्लक शारीरिक प्रयत्नांवर थकवा, स्नायू वेदना, धाप लागणे, डोकेदुखी, चक्कर येणे, ओठ फाटणे, तोंडाच्या काठावर जखमा, छातीत धडधड होणे.
उपाय (Ayurvedic treatment for anemia)
या मध्ये अँटी-ऑक्सिडेंट (Antioxidant) गुणधर्म आहे. जे शरीराला स्कर्वी (Scurvy) या आजारापासून संरक्षण करते. शरीरात कोलेजेन नावाची प्रथिने तयार करते. ज्यामुळे हाडे, रक्तवाहिन्या आणि शरीराच्या उतींची रचना आणि स्थिरता निर्माण होते. 14 ते 18 वर्षे वयोगटातील लोकांनी 75 मिलीग्राम आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांनी 90 मिलीग्राम व्हिटॅमिन सी दररोज खावेत. संत्रा किवां दररोज एक ग्लास लिंबू पाणी आपण पिऊ शकतो.
मनुका व खजूर (Raisins and Dates)
केळी आणि मध(Banana and Honey)
केळीमध्ये फॉलिक अॅसिड आणि बी 12 आहे. अशक्तपणाच्या उपचारात अत्यंत उपयुक्त आहेत. केळीवर व मधामध्ये लोह भरपूर असल्याने लोह शोषण्यास मदत होते.
गूळ आणि आले (Jaggery and Ginger)
तीळ (Black Sesame)
शरीरात लोहाचे प्रमाण वाढविण्याचा आणखी एक उत्तम मार्ग म्हणजे तीळ. विशेषत: काळी तीळ. तीळ पाण्यात दोन ते तीन तास भिजवून नंतर पेस्ट करून दररोज एक चमचा मधासह घ्यावे.
व्हिटॅमिन बी -12 ( Vitamin B-Complex)
बीट रस व डाळिंब रस (Beet and Pomegranate Juice)
शेवग्याची पाने (Moringa leaves)
आवळा( Amla)
अश्वगंधा (Withania somnifera)
हे एक हेमेटोजेनिक(Haematogenic) औषधी आहे. हेमेटोजेनिक म्हणजे हाडांच्या मज्जात लाल रक्तपेशी तयार करण्यास उत्तेजित करणे. अश्वगंधा मध्ये लोहाचे प्रमाणही अधिक असते त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. हे अँटीऑक्सिडेंट (Antioxidant), एंटी-इंफ्लेमेटरी(Anti-inflammatory) औषधी वनस्पती आहे. यामुळे थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे आणि छातीत दुखणे कमी होते. हे श्वास लागणे प्रतिबंधित करते आणि डोकेदुखी कमी करण्यास मदत करते. प्रौढांसाठी सामान्यत: निर्धारित डोज 2 – 4 चमचे दिवसातून 2 वेळा घ्यावे.
भृंगराज (Eclipta alba)
हे पचनास प्रोत्साहन देते. शरीरात विष (आम) जमा होण्यापासून प्रतिबंधित करून यकृत(Liver) च्या निरोगी कार्यास समर्थन देते. हे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते. भृंगराज पानांचा रस जेवण करण्यापूर्वी दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावा. यामध्ये मध, गूळ, हरीतकी पावडर, मिश्री किंवा दुध इत्यादी घटक एकत्रित करून प्यावे.
चिरायता (Swertia chirayita)
तांबे पात्र (Copper vessels)
तांबेच्या भांड्यात साठवलेल्या पिण्याच्या पाण्याची शिफारस आयुर्वेदात केलेली आहे. जे शरीराला नैसर्गिकरित्या खनिज पुरवठा करते. लोहाची पातळी वाढविण्यास मदत करते.
आहार (Diet for anemia)
- आहारात पालक, मेथीची पाने, आणि गाजर इत्यादी गडद हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा.
- संत्री, लिंबू, द्राक्षे, आवळा, शिमलामिर्ची, अननस, पपई, मनुका, स्ट्रॉबेरी सारख्या व्हिटॅमिन सी समृध्द आहाराचा समावेश करा. यामुळे लोह शोषण्यास मदत होते.
- आपल्या आहारात सोया आणि त्याचे पदार्थ, अंडी, मांस, मासे इत्यादी पदार्थांचा समावेश करावा.
- आपल्या आहारात संपूर्ण धान्य आणि कडधान्ये जसे– हरभरा, सोयाबीन, इत्यादींचा समावेश करा.
- कॉफी, चहा आणि जास्त प्रमाणात कॅल्शियम असलेले पदार्थ टाळा.
योगासने
- उज्जयी, अनुलोम विलोम, कपालभाती, योग आणि प्राणायाम आरबीसीची संख्या नैसर्गिकरित्या वाढविण्यास मदत करते, नियमित सराव केल्याने, या तीन प्राणायाममुळे संपूर्ण रक्ताभिसरण यंत्रणेचे कार्य सुधारते.
- सर्वांगासन, पश्चिमोत्थानासन, विप्रीत करणी मुंद्रा इत्यादी आसनामुळे रक्त पाय ते हृदयापर्यंत वाहून नेले जाते. त्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा पूरवठा योग्य प्रकारे होतो.
Very knowledgeable Article
Good info for my wife, thanks for sharing
Thanx for such a valuable information
Thanks Dr this information useful for my grandmother….. Piyush
Thanks Dr this information useful for my grandmother….. Piyush
Thanks Dr this information useful for my grandmother….. Piyush
Nice Useful Tips
❤️❤️❤️❤️
useful info
Nice Information