Ayurvedic Home Remedies for cold
आपण सर्दीसाठी एक आदर्श आणि प्रभावी उपाय शोधत आहात का ? तर सर्दीच्या व्यवस्थापनासाठी उत्कृष्ट मानल्या जाणार्या आयुर्वेदिक पद्धतींचा पर्याय निवडा(Ayurvedic Home Remedies for cold). आयुर्वेदानुसार सर्दी हा सामान्य दोष किंवा विकार आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात एकापेक्षा जास्त वेळा सर्दीचा त्रास होतो.
आयुर्वेदात या स्थितीला प्रतीश्याय म्हणून संबोधले आहे. सर्दीसाठी सामान्य: तिन्ही दोष जबाबदार आहेत. वात दोषामुळे सर्दी झाल्यास कोरडा खोकला, श्लेष्माचा स्त्राव आणि वाहणारे नाक ही सामान्य लक्षणे आहेत. पित्तामुळे होणाऱ्या सर्दीत घसा खवखवणे, ताप येणे यासारखी लक्षणे आढळतात. कफ दोष असलेल्या लोकांमध्ये सर्दी ही जाड श्लेष्मल स्त्राव, डोकेदुखी आणि डोके जड पडणे इत्यादी लक्षणे दर्शविली जातात.
सर्दीचे महत्वाचे आयुर्वेदिक उपचार खालीलप्रमाणे आहेत (Ayurvedic Home remedies for cold)
दालचिनी (Dalchini)
मिरेपूड, दालचिनी आणि मध पाण्यात उकळून घ्या. घसा खवखवणे, जुनाट सर्दीला होण्यापासून रोखण्यासाठी हे रामबाण उपाय आहे. दालचिनी आणि मुलठी (ज्येष्ठमध) हे दोन्ही सर्दीवर उपचार करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. अर्धा इंच लांब मुलेठीचा तुकडा घ्या आणि त्याला १ ग्लास पाण्यात उकळा. पाणी अर्ध्यावर घट्ट होईपर्यंत उकळवा. त्यानंतर अर्धा कप मुलेठी अर्कात दोन चिमूट दालचिनी पावडर घाला आणि दिवसातून दोनदा घ्या .
जिरे (Cumin seed) 
जिरेमध्ये एंटीसेप्टिक(antiseptic) गुणधर्म आहे. ताप, सर्दीवर हे प्रभावी उपचार आहेत. गळ्याचा त्रास देखील बरा होतो.
आवळा व गुडूची रस ( Amla – Giloy)
हे रोगप्रतिकारशक्ती (immunity) वाढवते. तसेच फुफ्फुसाच्या संसर्गावर यांचा उपयोग होत असल्यात्यामुळे कोरोनासारख्या भयंकर विषाणूशी लढण्यात मदत होते.
तुळशी – सुंठी क्वाथ ( Tulsi – Shunthi )
या दोन्ही द्रव्यांचा उपयोग कफ दोषाला संतुलित ठेवून विकृत कफ बाहेर टाकण्यासाठी केला जातो. एक मूठभर तुळशीची पाने घ्या. त्याची पेस्ट बनवा. एका पॅनमध्ये दोन कप पाणी घ्या व एक कप होईपर्यंत उकळवा. त्यात दोन चिमूट सुंठी पावडर घाला. क्वाथ कोमट असतांनादिवसातून तीन ते चार वेळा घ्या.
मध (Honey for cold)
मधामध्ये अँटीमायक्रोबायल(antimicrobial) आणि अँटीऑक्सीडंट (antioxidant) गुण अधिक प्रमाणात असतात. मध तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. यामध्ये विविध प्रकारच्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे अनेक घटक द्रव्य आहेत. चहामध्ये लिंबु व मध घालून पिल्याने घशातील वेदना कमी होतात. संशोधनात असे सुचवले आह. मधाच्या प्रभावाने खोकला देखील कमी होतो. तसेच एका संशोधनात असे आढळले आहे . झोपेच्या वेळी मुलांना 10 ग्रॅम मध दिल्याने त्यांच्या खोकल्याच्या लक्षणांची तीव्रता कमी होते. मुलांचे वय पाच वर्षांपेक्षा जास्त असेल तर दालचिनीची पूड, एक चमच मधात एकत्र करून द्यावे. नियमितपणे मधाचं सेवन केल्यास सर्दी, खोकला आणि कफचा त्रास सहसा जाणवत नाही.
जवस बियाणे (Flax Seeds)
सर्दी आणि खोकल्यावर जवसाच्या बियानांचा एक प्रभावी उपाय आहे. यासाठी जवसाच्या बियानांनमध्ये २ कप पाणी घालून १ कप पाणी आटेपर्यंत उकळून घ्या. मग थंड करून या पाण्यामध्ये १ चमचा लिंबाचा रस व १ चमचा मध घालून प्यावे.
आले आणि मिठाच मिश्रण (Ginger And Salt Mixture)
आल्याचा फक्त चहाच नाही तर चाटणही सर्दी-खोकल्यावर गुणकारी आहे. जर तुम्हाला आल्याचा चहा आवडत नसेल तर तुम्ही आल आणि मिठाच चाटण किंवा आल्याचे छोटे छोटे तुकडेही चावून खाऊ शकता. यामुळे तुमच्या घश्याला लगेच आराम मिळेल.
मसाला चहा (Masala tea)
मसाला चहा अगदी दैनंदिन जीवनातही काही लोक आवर्जून पितात. पण तुम्हाला माहीत आहे का, हाच मसाला चहा सर्दीवरही गुणकारी आहे. मसाला चहामध्ये तुळशीची पाने, आले आणि काळीमिरी घालून प्यायल्याने चांगला फायदा होतो. तसेच या तिन्ही घटकांमध्ये भरपूर औषधीय गुणधर्म आहेत.
हळदयुक्त दूध (Milk And Turmeric)
स्वयंपाकघरात सर्दी खोकल्यावर अगदी सहज उपलब्ध असलेला उपचार म्हणजे हळद.हळदीमध्ये अँटीऑक्सीडंट(Antioxidant),अँटीबक्तेरिअल (Antibacterial) गुणधर्म अधिक प्रमाणात असतात. हळद आणि गरम दूध हा सर्दी-खोकल्यावरील सर्वात सोपा असा घरगुती उपाय आहे. रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट दुधात एक छोटा चमचा हळद घालून सेवन करा. तुम्हाला लगेच फरक जाणवेल.
लसण – ओवा पोटली ( Garlic and Carom seeds )
एका पॅनमध्ये एक चमचा ओवा घ्या. त्यात ६ लसनाच्या पाकळ्या घालून भाजून घ्या. लसनाच्या पाकळ्यांचा पेस्ट व ओवा एका कापडात घेवून त्याची पोटली तयार करा. हि पोटली तव्यावर गरम करून छातीवर शेकल्यास चांगला आराम होतो.
लसण तेलासह बॉडी मसाज ( Garlic oil )
कढईत अर्धा कप तीळ तेल गरम करा, लसणाच्या चार-पाच पाकळ्या बारीक करून तेलात तळा. त्यानंतर कोमट तेल गाळून पाठ, टाळू आणि पायाची मालिश करा. दोन थेंब नाकपुडीत टाकून खोलवर श्वास घ्या. यामुळे श्वसंतंत्रातील अवरोध दूर होवून सुरळीत श्वसनास मदत होते.
पुदिनाचा तेलाचा वाफारा (Peppermint oil steam)
दोन ते तीन थेंब पुदिनाच तेल उकळत्या पाण्यात घाला आणि वाफ घ्या. हे अनुनासिक रक्तसंचय खुले करते.
वरील उपाय करण्याबरोबरच आपण आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवणारा आहार घ्यावा. आवळा, हळद असलेले दूध, लसने, पालेभाज्या, लिंबूवर्गीय फळे, बियाणे आणि शेंगदाणे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी चांगले आहेत. वयस्कर आणि मुलांसाठी च्यवनप्राश हा एक उत्कृष्ट कायाकल्प व रोग प्रतिकारशक्ती वाढविणारा आहे. दररोज एक चमचा च्यवनप्राशमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती बळकट होते आणि श्वसन प्रणालीतील सामान्य विकार टळतात.
आहारातील बदल (Ayurvedic Home Remedies for cold)
- सामान्य सर्दीच्या रुग्णांना संपूर्ण दिवस उपवास ठेवण्याची शिफारस केली जाते, ज्यामुळे शरीर विषारी द्रव्ये नष्ट करण्यास सक्षम होते.
- पालेभाज्यांचे सूप, उकळलेल्या भाज्या खाव्यात.
- दूध, दही, तेलकट व मसालेदार पदार्थ यासारखे पचनास कठीण असलेले खाद्य पदार्थ टाळावे.
Thanks For Giving This Useful & Healthy Information
Thanks For Giving This Useful & Healthy Information
nice
धन्यवाद प्रणिता मॅडम खूप सुंदर माहिती दिली.नक्कीच उपाय करून बघु.
Definitely we will try this at home
Thanks for giving such a great useful information.
Informative…useful one in this pandamic period…
Ayurved ka khajana👍👍👍
👍👍👍
very detailed information and useful 👍👍
Useful content.
Amazing and very useful information..
Good information (:
👍